दिव्यांग बांधवांसाठी ‘इको सिस्टीम’ राबविण्याचा मानस

- मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर




लातूर
दि. 04 (जिमाका) : दिव्यांग बांधवांसाठी सर्वसमावेशक धोरण तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करून ‘इको सिस्टीम’ तयार करण्याचा मानस आहे. यासाठी संवेदना प्रकल्प व समाज कल्याण विभागाने पुढाकार घेऊन दिव्यांगांना सशक्त बनवावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर आज येथे म्हणाले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त केंद्र शासनाच्या बौद्धिक दिव्यांग अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने हरंगुळ येथील संवेदना प्रकल्प येथे आयोजित शीघ्र हस्तक्षेपपुनर्वसन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटीलजिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडीसामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य सुरेश पाटीलकार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ. रविप्रकाश सिंग यांची यावेळी उपस्थिती होती.

 दिव्यांग बांधवांना सर्व सेवा-सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असून अडथळा विरहित वातावरणात त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यावरही भर देण्यात येत आहे. दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी लातूरमधील अनेक प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरले आहेत. भविष्यातही संवेदनाच्या माध्यमातून निवासी व व्होकेशनल शिक्षण सुरू होत असून हे पहिले केंद्र ठरेल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सागर यांनी सांगितले.


प्रास्ताविक डॉ. योगेश निटूरकर यांनी केले. सूत्रसंचालन सिंधू इंगळे यांनी तर आभार व्यंकट लामजने यांनी मानले. या कार्यशाळेस आशा वर्करविशेष शाळेतील मुख्याध्यापकशिक्षक व स्पीच थेरपिस्ट अशा एकूण 265 जणांनी सहभाग नोंदविला. यावेळी बौद्धिक दिव्यांगांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाचे राजू गायकवाडदिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बस्वराज पैके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिव्यांगासाठी बांधण्यात आलेल्या नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध शाखांना भेटी देत समाधान व्यक्त केले.

दिव्यांग बांधवांना वैश्विक कार्डचे वाटप

लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयात झालेल्या दोन दिवसीय शिबिरात मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिव्यांगांना वैश्विक (युडीआयडी) कार्डचे वाटप केले. यावेळी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांच्यासह महाविद्यालयातील डॉक्टरांची उपस्थिती होती.

*****


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा