संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

                                             संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

लातूर, दि. 13 (जिमाका) :   महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि लिंगायत समाजासाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना दिनांक 9 ऑगस्ट, 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार झाली आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कार्यान्वयीत करण्यात आले आहे.

या महामंडळामांमार्फत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ , पहिला मजला, जात पडताळणी इमारत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्याय भवन, शिवनेरी गेटसमोर, गुळ मार्केट, लातूर (दुरध्वनी क्रमांक -02382-253334) येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लातूर जिल्हा व्यवस्थापक पी.सी. पोहरे यांनी केले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु