स्पेशल ऑलम्पिक भारतच्यावतीने आयोजित कार्यशाळेत 220 जणांचा सहभाग
लातूर, दि. २० (जिमाका) : जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व स्पेशल ऑलम्पिक भारत, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरच्या संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहात ऑलम्पिकविषयी कार्यशा
स्पेशल ऑलम्पिक भारतचे सचिव डॉ. भगवान तलवारे, स्पोर्टस डायरेक्टर जितेंद्र ढोले, विभागीय प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, हिंगोलीचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, राजु एडके, नांदेडचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, सहायक सल्लागार बाळासाहेब वाकडे, धाराशिव बालगृहाचे अध्यक्ष शहाजी चव्हाण, श्री गजानन बहुउददेशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब कदम यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगाच्या जनक डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
बौध्दिक अक्षम मुलांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित होणाऱ्या स्पेशल ऑलम्पिक मधील क्रीडा प्रकारांची माहिती देणे यासाठी आवश्यक क्रीडा प्रशिक्षकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण उपलब्ध करून देणे . तसेच स्पेशल ऑलम्पिक क्रीडा स्पर्धांकरीता संस्थांची व क्रीडापटूंची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी कशा पध्दतीने करायची ही माहिती देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उददेश होता. यावेळी स्पेशल ऑलम्पिक राज्यस्तरीय बास्केटबॉल् व व्हॉलीबॉल स्पर्धेत यश मिळविणाऱ्या बालगृहातील अनाथ मतिमंद मुलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विभागीय कार्यशाळेस बौध्दिक अक्षम मुलांमुलींच्या दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, विशेष शिक्षक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नितीन वाघ यांनी केले. आभार राजू गायकवाड यांनी मानले.
****
Comments
Post a Comment