‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत बुधवारी* *विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती*
*‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत बुधवारी*
*विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती*
लातूर, दि. 12
(जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच
त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ही विशेष मोहीम
24 नोव्हेंबर, 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली
जात आहे. या मोहिमेंतर्गत बुधवार, 13 डिसेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये
चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे
वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित
राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विकसित भारत संकल्प
यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री
उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार
के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात
येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित
लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
13 डिसेंबर,2023
रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी कुमठा बु, दुपारी कौडगाव, औसा तालुक्यात सकाळी उंबडगा
खु., दुपारी उटी बु., चाकूर तालुक्यात सकाळी केंद्रेवाडी, दुपारी महालंगी, देवणी तालुक्यात
सकाळी सावरगाव, दुपारी होनाळी, जळकोट तालुक्यात येवरी, दुपारी लाळी बु., लातूर तालुक्यात
सकाळी बाभळगाव , दुपारी सिरसी, निलंगा तालुक्यात सकाळी कासारबालकुंदा व दापका, दुपारी
पिरुपटेलवाडी व लांबोटा, रेणापूर तालुक्यात सकाळी सुमठाणा, दुपारी समसापूर, शिरुर अनंतपाळ
तालुक्यात सकाळी तुरुकवाडी, दुपारी हाणमंतवाडी, उदगीर तालुक्यात सकाळी सोमनाथपूर, दुपारी
क्षेत्रफळ येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
****
Comments
Post a Comment