नाफेड प्रथमच बाजार भावात तूर खरेदी करणार
नाफेड प्रथमच
बाजार भावात तूर खरेदी करणार
लातूर, दि. 21 (जिमाका) : नाफेडच्यावतीने
पीएसएफ योजनेंतर्गत (खुल्या बाजारभावाने) पणन महासंघाच्यावतीने सबएजंट संस्थांकडून तूर खरेदी करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील एकूण सहा केंद्राना परवानगी दिलेली आहे. नाफेड प्रथमच हमी भावात नव्हे, तर बाजारभावात तूर खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचे जिल्हा
मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.
नाफेडतंर्गत तूर खरेदीसाठी लातूर जिल्ह्यातील जागृती प्रगती बिजो-उत्पादन
प्रक्रिया पणन सहकारी संस्था म. लातूर, औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ
म. औसा, रेणुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ म. रेणापूर,
जिजामाता मिरची प्रक्रिया पणन सहकारी संस्था म. सेलु (बु) ता. लातूर, तालुका
सहकारी खरेदी विक्री संघ म. देवणी व साताळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म.
सताळा (खु) ता. अहमदपूर यांच्यामार्फत नोंदणी व खरेदीसाठी मंजूरी मिळालेली आहे.
शासनाने तुरीचा हमीभाव 7 हजार रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. परंतु, बाजारात सध्या 9 हजार 300 रुपये ते 9 हजार 700 रुपयेपर्यंतचे
भाव सुरु आहेत. तरी शासनाने खुल्या बाजार भावाने तूर खरेदीसाठी आदेश दिलेले
आहेत. शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर जावून चालू हंगामाचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, राष्ट्रीयकृत
बँकेचे खाते, आधारकार्ड व सुरु असलेला मोबाईल नंबर घेवूनच नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment