अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती अभियानात स्काऊट आणि गाईडनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

 अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती अभियानात

स्काऊट आणि गाईडनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

लातूरदि. 08 (जिमाका) : जिल्हा परिषद शिक्षण विभाग व लातूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय तसेच जेएसपीएम शिक्षण संस्थेच्यावतीने अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती करण्यासाठी व्यसनमुक्तीपर गीतपथनाट्यअंमलीपदार्थ भितीपत्रकाचे विमोचन तसेच प्रतिकात्मक अंमलीपदार्थ भस्मासुराचे दहन करून व्यसनमुक्तीची संदर्भात शपथ घेण्यात आली.

माजी आमदार तथा जेएसपीएम अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर तसेच लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरजीएसपीएमचे उपाध्यक्ष अजित कव्हेकरजिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणेजिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागरजिल्हा कोषाध्यक्ष तथा उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, प्राचार्य गोविंद शिंदेसहजिल्हा चिटणीस अरुणा कांदे, स्काऊट गाईड युनिट लीडर आदी यावेळी उपस्थित होते.

प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करून त्याचे पालन करणे आवश्यक असलायचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.

माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर, अजित कव्हेकर यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात प्राथमिकचे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी स्काऊट गाईडचीची भूमिका व  1 डिसेंबर पासून जिल्हा परिषद व इतर शाळांमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा या स्वरूपात कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगितले.

जिल्हा संघटक डॉ. शंकर चामे यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. गोविंद शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*****











Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा