‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत बुधवारी विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती
‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत बुधवारी
विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती
लातूर, दि. 19 (जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत
पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प
यात्रा’ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर,
2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या
मोहिमेंतर्गत बुधवारी, 20 डिसेंबर,
2023 रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची
माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी
करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन
जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन,
आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि
विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत
आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या
लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची
नोंदणी करण्यात येत आहे.
20 डिसेंबर,2023 रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी चीलखा, दुपारी थोडगा, औसा
तालुक्यात सकाळी येल्लोरी, तळणी, दुपारी गुळखेडा व बाणेगाव, चाकूर तालुक्यात
सकाळी चापोली, दुपारी नायगाव, देवणी तालुक्यात सकाळी सय्यदपूर, दुपारी कवठाळा,
जळकोट तालुक्यात वडगाव, दुपारी होकर्णा, लातूर तालुक्यात सकाळी वासनगाव, ढोकी,
दुपारी गंगापूर, कासारजवळा निलंगा तालुक्यात सकाळी मानेजवळगा, चिंचोडी, दुपारी
सावरी व हंचनाळ, रेणापूर तालुक्यात सकाळी असराचीवाडी,
दुपारी यशवंतवाडी, उदगीर तालुक्यात सकाळी कल्लूर, दुपारी हकनकवाडी येथे विकसित
भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
****
Comments
Post a Comment