जळकोट येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार
जळकोट येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी
खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार
लातूर, दि. 01 (जिमाका) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संचलित जळकोट येथील मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी खाजगी इमारत भाडे तत्वावर घ्यावयाची आहे. तरी जळकोट नगर परिषद हद्दीतील इमारत मालकांनी आठ दिवसाच्या आत जळकोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 वी जयंती मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसतिगृहासाठी 100 विद्यार्थ्यांची निवासाची सोय, पुरेशे बाथरुम, रुम्स, टायलेट्स, 24 तास मुबलक पाणी, हॉल्स, किचन, विद्युत व्यवस्था, पार्किंग अशी व्यवस्था असणारी सर्व अत्यावश्यक सोयी सुविधायुक्त इमारत आवश्यक आहे. अशी इमारत असल्यास इमारतीमधील उपलब्ध सोयी सुविधांची माहिती, इमारतीचे फोटो, इमारत मालकी हक्काबाबतची कागदपत्रासह इमारत भाडेतत्वावर देणे संबंधित प्रस्ताव आठ दिवसांच्या आत कार्यालयीन वेळेत गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 व्या जयंती नवीन मुलींची शासकीय वसतिगृह जळकोट ता. जळकोट या कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जळकोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 वी जयंती मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किर्दत एम. व्ही. यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment