क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा
क्रीडा व युवक
कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर
जिल्हा दौरा
लातूर, दि. 19
(जिमाका) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे बुधवार, 20 डिसेंबर, 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 20 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 6. 30 वाजता लातूर येथे आगमन होईल व
शकुंतला निवासस्थान येथे राखीव. सकाळी 10. 50
वाजता मोटारीने शकुंतला निवासस्थान येथून बाभळगाव रोडवरील ओम हामणे
पॅराडाईजकडे प्रयाण करतील. सकाळी 11.35
वाजता ओम हामणे पॅराडाईज येथे होणाऱ्या धर्मपाल
अण्णाराव देवशेट्टे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता मोटारीने लातूर येथून उदगीरकडे प्रयाण करतील.
उदगीर शहरातील सर्वोदय हाऊसिंग सोसायटीमधील दत्त मंदिर येथे दुपारी 2 वाजता
होणार्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास ते उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता उदगीर शहरातील
एकुर्का रोडवरील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये राज्य शासनाच्या
शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत मंजूर झालेल्या बंदिस्त प्रेक्षागृहाच्या भूमीपूजन समारंभास ते उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार मोटारीने उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील.
***
Comments
Post a Comment