जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून
उदगीर, जळकोट तालुक्यातील विकासकामांची पाहणी
लातूर, दि. 22 (जिमाका): उदगीर आणि जळकोट तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकासकामांची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. तसेच सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, अधीक्षक अभियंता इलियास चिस्ती, शिवराज एमपल्ले, गटविकास अधिकारी नरेद्र मेडेवार, कृषी अधिकारी आकाश पवार, अभियंता विरभद्र स्वामी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तिरू नदीवर होत असलेले तिरुका आणि डोंगरगाव येथील बॅरेज, उदगीर व जळकोट येथील प्रशासकीय इमारती, बौद्ध विहार, उदगीर येथील नवीन शासकीय विश्रामगृह, विविध स्मशानभूमीची कामे, नगरपालिकेचे ग्रंथालय, अभ्यासिका आदी कामांची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली.
विविध शासकीय इमारती आणि इतर विकास कामे गुणवत्तापूर्ण होतील, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करावा. यामध्ये कोणतीही कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. या कामांची पाहणी करताना दिलेल्या सूचनांवर पंधरा दिवसांत आवश्यक कार्यवाही करावी. या सर्व बाबींचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*****
Comments
Post a Comment