पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ
वृत्त क्रमांक : 18
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ
लातूर, दि.04 (विमाका) : राज्यात विमा योजना अंतर्गत 2023-24 मध्ये कोकणातील आंबा आणि राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर, 2023 असा होता. त्यास दोन दिवसांची मुदवाढ देण्यात आली असून त्याची वाढीव मुदत
4 व 5 डिसेंबर,2023 अशी आहे.
पीक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे इच्छुक शेतकरी या योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाकडून या दोन दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भागातील आंबा पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर, 2023 तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 डिसेंबर, 2023 असा आहे. या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
***
Comments
Post a Comment