लातूर शहर संजय गाधी निराधार योजना समितीच्या बैठकीत 1 हजार 711 अर्जावर निर्णय
लातूर शहर संजय गाधी निराधार योजना समितीच्या बैठकीत 1 हजार 711 अर्जावर निर्णय
लातूर, दि. 29
(जिमाका):- संजय
गांधी निराधार योजना समिती लातूर शहर अध्यक्ष शिवसिंह गोविंदसिंह सिसोदिया यांच्या
अध्यक्षतेखाली जून 2023
ते डिसेंबर 2023 पर्यत प्रलंबित असलेल्या 1 हजार 711 संजय गांधी निराधार योजना अर्जावर 27 डिसेंबर,
2023 रोजी लातूर तहसील
कार्यालय येथे
झालेल्या बैठकीत निर्णय
घेण्यात आला.
या बैठकीस लातूर तहसीलदार
तथा समितीचे सदस्य सौदागर तांदळे, अजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रमोद
मधुकरराव गुडे, अॅड. विजयकुमार बब्रुवान आवचारे, दिपमाला जयराम तुपकर, कमलाकर नागोबा
डोके, नरेश सोमनाथ पंड्या, दशरथ मनोहर सलगर, कल्पनाताई शिवाप्पा
बावगे, लताताई बब्रुवान घायाळ व महानगरपालिका आयुक्त यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार माडजे सविता, शिंदे
नारायण मोहनराव, बिरादार सुप्रिया, बाळासाहेब जाधव, हाशमी शेख यांनी परिश्रम
घेतले.
****
Comments
Post a Comment