विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद वंचित नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा - खासदार सुधाकर शृंगारे

 

विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वंचित नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा

-         खासदार सुधाकर शृंगारे


लातूर
, दि. 10 (जिमाका) : केंद्र शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. ज्या पात्र नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही, त्यांची या माध्यमातून नोंदणीही केली जात आहे. या यात्रेचा लाभ घेत वंचित नागरिकांनी शासकीय योजनांसाठी नोंदणी करावी, असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले.

लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील सोनानगर येथे रविवारी विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार श्री. शृंगारे बोलत होते देविदास काळे, ॲड. गणेश गोमचाळे, अमोल गिते, बालाजी मारखडे, दुर्गेश चव्हाण, डॉ .बोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते.


विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून दीनदयाळ  अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, उज्ज्वला योजना, आधारकार्ड तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली. सर्व पात्र नागरिकांनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन खा. शृंगारे यांनी यावेळी केले.

लातूर शहर महानगरपालिकेच्यावतीने शहराच्या विविध भागात यात्रेचे नियोजन करण्यात आले असून त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोनानगर येथे परिसरातील जवळपास 500 नागरिकांची उपस्थिती होती.

******

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा