‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत शनिवारी विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती
‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत शनिवारी
विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती
लातूर, दि. 08 (जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत शनिवार, 9 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
9 ऑक्टोबर रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी सावरगांव थोट, दुपारी हंगरगा, औसा तालुक्यात सकाळी किनीथोट, दुपारी येळी, चाकूर तालुक्यात सकाळी बनसावरगाव, दुपारी बोळेगाव, देवणी तालुक्यात सकाळी बटनपूर, दुपारी लासोना, जळकोट तालुक्यात सकाळी पाटोदा बु., दुपारी कोळनुर, लातूर तालुक्यात सकाळी भाडगाव, दुपारी रमजनापूर, निलंगा तालुक्यात सकाळी हणमंतवाडी व निटूर, दुपारी वाडीकासारशिरसी व ताजपूर, रेणापूर तालुक्यात सकाळी वाला, दुपारी तत्तापूर, शिरुर अनंतपाळ तालुक्यात सकाळी बेवनाळ, दुपारी हालकी, उदगीर तालुक्यात सकाळी हेर, दुपारी कुमठा येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
*****
Comments
Post a Comment