जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा
लातूर, दि. १९ (जिमाका) : अल्पसंख्यांक हक्क दिनिनिमित्त सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यात अल्पसंख्यांक कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी
सुनील यादव, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, नितीन वाघमारे, प्रियांका आयरे, अहिल्या
गाठाळ, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सह आयुक्त रामदास कोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी,
जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बी. एस.
दौलताबाद यांच्यासह जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. जिल्हा नियोजन अधिकारी श्री.रेड्डी यांनी यावेळी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच त्याबाबतचे सादरीकरण केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. यादव, लेखाधिकारी एस. जी. कडेकर यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक जिल्हा नियोजन अधिकारी वामन जाधव आणि एस. एस. साबरे, महानगरपालिकेचे श्री. जफर कादरी, संजय कलशेट्टी, अमोल वडगणे, सतिश बनसोडे, विजय परभणकर, श्री. हालगे व श्रीमती राधिका वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले.
****
Comments
Post a Comment