९ ते ११ डिसेंबर, २०२३ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धांचे उदगीर येथे आयोजन
९ ते ११ डिसेंबर, २०२३ या कालावधीत
राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धांचे उदगीर येथे आयोजन
लातूर, दि. 07 (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. ९ ते ११ डिसेंबर, २०२३ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, मेन रोड, उदगीर, (जिल्हा परिषद प्रशाला मैदान) उदगीर, ता. उदगीर जि. लातूर येथे होत आहे.
सदर राज्यस्तरीय स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर अशा एकुण ८ विभागातून १७ / १९ वर्षाआतील मुले १६० य मुली १६० असे एकूण ३२०, खेळाडू आणि ३२ क्रीडा मार्गदर्शक / संघ व्यवस्थापक सहभागी होत आहेत. तसेच राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणी करीता प्रत्येक विभागामधून ५ खेळाडू निवड चाचणी करीता असे एकूण ५१२ खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेमधून निवड करण्यात आलेला संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागी १८ संघ आणि राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड चाचणीकरीता प्रत्येक विभागातून ५ खेळाडू दि. ९ ते ११ डिसेंबर २०२३ या कालावधीत उदगीर शहरात वास्तव्यास आहेत. सर्व खेळाडूंची निवासाची व्यवस्था उदगीर शहरातील जयहिंद पब्लीक स्कुल, उदगीर येथे मुले व श्री. शिवाजी महाविद्यालयाचे वस्तीगृह येथे मुलींची निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे उद्घाटन दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ठिक ४-३० वाजता उद्घाटन संपन्न होणार आहे.
***
Comments
Post a Comment