उद्योजकांना एकाच व्यासपीठावर मिळणार विविध शासकीय योजनांची माहिती
उद्योजकांना एकाच व्यासपीठावर मिळणार
विविध शासकीय योजनांची माहिती
· उद्योग संचालनालयाच्यावतीने शुक्रवारी एकदिवसीय कार्यशाळा
लातूर, दि. 06 (जिमाका) : राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी, तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत. या सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्यासाठी सर्व विभागांच्या सहकार्याने लातूर एमआयडीसीमधील जिल्हा उद्योग समूह हॉलमध्ये 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हणबर यांनी कळविले आहे.
एक दिवसीय कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इ.आमंत्रित करण्यात येत आहे. कार्यशाळा 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 पासून लातूर जिल्हा उद्योग समूह हॉल, एकमत भवनच्या पाठीमागे, एमआयडीसी, लातूर येथे होणार असून इच्छुकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहणायचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. हणबर यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment