जिल्हास्तरीय सामाजिक न्याय समितीच्या सभेत सामाजिक अंकेक्षणाचा आढावा
लातूर, दि. 14 (जिमाका) : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमता मंत्रालय यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी या योजनांचे सामाजिक अंकेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा जिल्हास्तरीय सामाजिक न्याय सभेत आढावा घेण्यात आला. उपजिल्हाधिकारी संगीता टकले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आर. डी.
देशमुख, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, जिल्हा समाज कल्याण
अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सामाजिक
अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी यांच्याकडून लातूर जिल्ह्यात माहे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये
इंटिग्रेटेड रिहाबिलेशन सेंटर फॉर ॲडिक्ट अंतर्गत लातूर येथील जीवन रेखा
प्रतिष्ठान आणि पंचशील व्यसनमुक्ती व उपासचार केंद्र, खाडगाव येथील श्री गणेश
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुक्तिगरम व्यसनमुक्ती केंद्र, लातूर येथील रेसिडेन्शियल
स्कूल अंडर श्रेष्ठा अंतर्गत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुल, भारत मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी (एनजीओ), तसेच
सीनियर सिटीजन होमस अंडर एव्हीवायएवाय अंतर्गत उदगीर, निडेबन येथील ज्ञाना शिक्षण
संस्था व निलंगा तालुक्यातील कासारशिरसी येथील एकता बहुउद्देशीय महिला मंडळ या
संस्थेचे सामाजिक अंकेक्षण करण्यात आले. या अंकेक्षणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय
सामाजिक न्याय सभा 13 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित
करण्यात आली होती.
सामाजिक अंकेक्षण करण्यात आलेल्या संस्थांचे अहवाल वाचन सामाजिक
अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीचे जिल्हा साधन व्यक्ती वैभव वटाणे, मोहन घागळे, तसेच
शिलवंत धुळे यांनी बैठकीत सादर केले. सामाजिक अंकेक्षण अहवालाच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी
संगीता टकले यांनी अहवालातीलल त्रुटीवर आवश्यक कार्यवाही विहित कालमर्यादेत करण्याच्या
सूचना संबंधितांना दिल्या.
******
Comments
Post a Comment