रेणापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार
रेणापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी
खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार
लातूर, दि. 27 (जिमाका) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संचलित रेणापूर येथील मुलांच्या
वसतिगृहासाठी 100 विद्यार्थ्यांची निवासाची सोय, पुरेशे बाथरुम, रुम्स, टायलेट्स, 24 तास मुबलक पाणी, हॉल्स, किचन, विद्युत व्यवस्था, पार्किंग अशी व्यवस्था असणारी सर्व अत्यावश्यक सोयी सुविधायुक्त इमारत आवश्यक आहे. अशी इमारत असल्यास इमारतीमधील उपलब्ध सोयी सुविधांची माहिती, इमारतीचे फोटो, इमारत मालकी हक्काबाबतची कागदपत्रासह इमारत भाडेतत्वावर देणे संबंधित प्रस्ताव आठ दिवसांच्या आत कार्यालयीन वेळेत गृहपाल, मुलांचे शासकीय वसतिगृह, रेणापूर ता. रेणापूर जि. लातूर या कार्यालयास सादर करावा, असे आवाहन रेणापूर येथील मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल भुसे वाय. बी. यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment