राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत पुणे आणि नाशिक विभागाचे वर्चस्व

 

राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत पुणे आणि नाशिक विभागाचे वर्चस्व

लातूर दि. 12 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या राज्यस्तर शालेय डॉजबॉल स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेच्या निकालात पुणे आणि नाशिक विभागाचे वर्चस्व राहिले.

मुलांच्या १७वर्ष गटामध्ये प्रथम क्रमांक पुणे विभाग, व्दितीय क्रमांक नाशिक व तृतीय क्रमांक कोल्हापूर आणि १९ वर्ष गटामध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूर विभाग, व्दितीय क्रमांक नाशिक व तृतिय क्रमांक अमरावती विभागाने पटकवून वर्चस्व राखले. तर मुलींच्या १७ वर्षे गटात प्रथम क्रमांक अमरावती विभागाने, व्दितीय क्रमांक नागपूर विभागाने तर तृतिय क्रमांक कोल्हापूर विभागाने पटकाविला. १९ वर्षे गटात प्रथम क्रमांक पुणे विभागाने, व्दितीय क्रमांक नाशिक विभागाने तर तृतिय क्रमांक अमरावती विभागाने पटकविला. स्पर्धेतील निवड झालेल्या मुलांची राष्ट्रीय शालेय डॉजबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड करण्यात येणार आहे.

उदगीर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उदगीरचे तहसिलदार रामेश्वर गोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद नवले, माजी नगरसेवक, फैयाझ शेख, उपप्राचार्य डॉ.मांजरे, परवेज कादरी, इफ्तेखार शेख, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर, क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, अभिजीत मोरे, अमर मगर, सतिश पाटील, नजीब मोमीन, जिल्हा डॉजबॉल संघटनेचे अशोक परीट, संतोष कोल्ले, गुरुदत्त महामुनी उपस्थित होते.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु