निवडणूक कार्यालय गावोगावी जाऊन ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बद्दल होतेय जागृती जिल्हाधिकाऱ्यांनी जनजागृती रथाला दाखवला झेंडा
निवडणूक कार्यालय गावोगावी जाऊन ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बद्दल होतेय जागृती
जिल्हाधिकाऱ्यांनी जनजागृती रथाला दाखवला झेंडा
लातूर, दि. 11 (जिमाका): जिल्ह्यातील नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात एलईडी रथ फिरणार असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवून मोहिमेला सुरुवात केली. संपूर्ण जिल्ह्यात ही जनजागृती मोहिम सुरु असून ती 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होवून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती जाणून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या 14 नोव्हेंबर, 2023 रोजीच्या पत्रानुसार निवडणूक घोषित करण्याच्या तीन महिने आगोदर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रात्यक्षिक केंद्र व मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनव्दारे जनजागृती करण्यात येत आहे.
त्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम (EVM) व व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीन्सच्या प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती याकरिता लातूर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या एकूण मतदान केंद्राच्या 10 टक्के टक्के इतक्या मर्यादेत ईव्हीएम व डब्ल्युपॅट मशीनचा वापर करण्यात येत आहे.
लातूर शहरातील बार्शी रोड गोडावूनमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, बार्शी रोड, लातूर येथील मध्ये प्रथम स्तरीय तपासणी झालेल्या मशीन्स ठेवण्यात आलेल्या आहेत. मशीनच्या प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृतीसाठी जिल्ह्यात असलेल्या एकूण मतदान केंद्राच्या 10 टक्के इतक्या मर्यादेत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनला.7 डिसेंबर, 2023 रोजी स्कॅनिंग व स्टीकर (Training/Awareness) लावण्यात आले आहेत.
8 डिसेंबर, 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सच्या प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती याकरिता भारत ईलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे अभियंते अनिलकुमार व जितेंद्रकुमार यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणास लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व नायब तहसलिदार निवडणूक, लातूर जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्स व अधिकारी, कर्मचारी यांना उपस्थित होते.
***
Comments
Post a Comment