सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला जिल्हाधिकारी कार्यालयातून आजपासून होणार प्रारंभ
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला
जिल्हाधिकारी कार्यालयातून आजपासून होणार प्रारंभ
लातूर, दि. 06 (जिमाका) : युध्दात वीरमरण पत्करलेल्या, अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या व अवलंतिबांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजदिन निधी संकलनाचा कार्यक्रम देशात प्रत्येकवर्षी 7 डिसेंबर रोजी सशस्त्र ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी येथे 7 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 11 वाजता सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलनास प्रारंभ होणार आहे.
या कार्यक्रमाल लातूर जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरपिता, शौर्य पदकधारक, सैन्य अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व त्यांचे अवलंबित यांच्यासह जिल्ह्यातील इतर नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे व ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा सनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment