विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी 21 गावांमध्ये जाणार ‘विकसित भारत संकल्प यात्रा’

 लातूर, दि. 14 (जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विकसित भारत संकल्प यात्राही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

 15 डिसेंबर,2023 रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी वायगाव, दुपारी गादेवाडी, औसा तालुक्यात सकाळी कवठा केज, दुपारी भेटा, चाकूर तालुक्यात सकाळी शिवणी म., दुपारी हाडोळी, देवणी तालुक्यात सकाळी डोंगरेवाडी, दुपारी नेकनाळ, जळकोट तालुक्यात सकाळी हावरगा, दुपारी येलदरा, लातूर तालुक्यात सकाळी मळवटी, दुपारी कोळपा, निलंगा तालुक्यात सकाळी कलमुगळी व जाजणूर, दुपारी टाकळी व तळीखेड, रेणापूर तालुक्यात सकाळी सेलू, दुपारी जवळगा, शिरुर अनंतपाळ तालुक्यात सकाळी हिप्पळगाव, उदगीर तालुक्यात सकाळी डाऊळ, दुपारी डोंगरशेळकी येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु