डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी पानगाव येथील बाबासाहेबांच्या अस्थींना जिल्हाधिकारी यांनी केले अभिवादन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी पानगाव येथील बाबासाहेबांच्या अस्थींना
जिल्हाधिकारी यांनी केले अभिवादन
लातूर दि.6 ( जिमाका ) भारतरत्न, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पानगाव येथे त्यांच्या जतन केलेल्या अस्थिंचे लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे यांनी अभिवादन केले.
आज सहा डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनी देशभर अभिवादन केले जाते. मुंबई येथे चैत्यभूमीवर राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासह लाखो लोकांनी अभिवादन केले. पानगाव येथेही दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवलेल्या असल्यामुळे हजारो लोकं अत्यंत श्रद्धेने येथे येऊन अभिवादन करतात. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, पोलीस अधिक्षक सोमय मुंढे यांनीही यावेळी अभिवादन केले. येथे येणाऱ्या लोकांच्या सोयसुविधे बद्दलही प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.
****
Comments
Post a Comment