30 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान लातूर शहरात विशेष मतदार नोंदणी शिबीर

 

30 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान

लातूर शहरात विशेष मतदार नोंदणी शिबीर

 

लातूर, दि. 29 (जिमाका):-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अनुषंगाने विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्याबाबत निवडणूक आयोगाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा मार्गदर्शनाखाली 30, 31 डिसेंबर, 2023 व 1 जानेवारी, 2024 रोजी 235-लातूर शहर मतदारसंघामध्ये विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा लातूर शहर मतदारसंघ -235 च्या मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांनी दिली.

भारत आयोगाच्या 29 मे, 2023 च्या पत्रान्वये  1 जानेवारी, 2024 या आर्हता दिनांक आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यानुसार मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी 5 जानेवारी, 2024 रोजी होणार होती. या कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली असून मतदार यादी अंतिम प्रसिध्दीचा 5 जानेवारी, 2024 या ऐवजी  22 जानेवारी, 2024 असा करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतवाढीमध्ये लातूर शहर मतदारसंघ अंतर्गत 30, 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी लातूर शहरामधील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तरी तीन दिवसांमध्ये लातूर शहरातील सर्व नवमतदारांनी तेथे असलेल्या बीएलओ यांच्याकडे फॉर्म -06 भरुन द्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीमती नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु