*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर दौरा*

 *क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर दौरा*


लातूर दि.9 ( जिमाअ ) :- राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे रविवार, 10 डिसेंबर, 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

ना. बनसोडे हे 10 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता लातूर येथील शकुंतला निवास येथून मोटारीने बसवेश्वर चौककडे प्रयाण करतील. दुपारी 12.35 वाजता बसवेश्वर चौक कातपूर रोडवरील पार्वती मंगल कार्यालयात अनिल बनसोडे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 3.00 वाजता लातूर शहरातील एलआयसी कॉलनीतील रुद्रेश्वर मंदिर येथे 91 व्या सत्संग सोहळानिमित्त श्री. शिवानंद हैबतपुरे यांची भव्य बसव कथा सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 3.30 वाजता लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. 

उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे दुपारी 4.30 वाजता आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास ना. बनसोडे उपस्थित राहतील. सांयकाळी 5 वाजता उदगीर येथील मुसा नगर येथे सय्यद समद याकुब साहाब यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त सदिच्छा भेट देतील. सांयकाळी 5.30 वाजता उदगीर शहरातील बिदर रोडवरील बियाणी वेअरहाऊस येथील कैलाशचंद्र बियाणी यांच्या 51 व्या लग्न वाढदिवस समारंभनिमित्त सदिच्छा भेट देतील. 
****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु