पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनांसाठी अर्ज करण्यास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

                                            पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय आणि

जिल्हा वार्षिक योजनांसाठी अर्ज करण्यास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

लातूर, दि. 11 (जिमाका):  सन 2023-2024 या वित्तीय वर्षातील पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेतंर्गत लाभार्थ्यांना अर्ज ah.mahabms या प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सदर वेळापत्रकानुसार सन 2023-2024 साठी ऑनलाईन अर्ज स्विकारणे व जुने लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हास्तरावर कागदपत्रे पडताळणी करुन निवड करण्यासाठी या वर्षासाठी ah.mahabms या प्रणालीवर अर्ज स्वीकरण्यात येत आहेत. नवीन वेळापत्रकानुसार

15 डिसेंबर, 2023 सन 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी. 16 व 17 डिसेंबर, 2023 पर्यंत डाटाबॅकअप करणे, 18 ते 20 डिसेंबर, 2023 दरम्यान लाभार्थींची रॅडमायझेशन पध्दतीने प्राथमिक यादी तयार करण्यात येईल.  21 डिसेंबर, 2023 राखीव एक दिवसाचा कालावधी, 22 ते 26 डिसेंबर, 2023 दरम्यान नवीन प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर कागदपत्रे पडताळणी करुन निवड करण्यात येईल. 27 ते 29 डिसेंबर, 2023 दरम्यान सर्व लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता करण्यात येईल. 30 डिसेंबर, 2023 रोजी कागदपत्रे अंतिम पडताळणीसाठी होईल. दि. 31 डिसेंबर, 2023 रोजी पात्र अंतिम लाभार्थी यादी तयार करण्यात येईल, असे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे. असा एकूण 53 दिवसांचा कालावधी असणार आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु