*एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24* अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी विविध बाबींसाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

                                       *एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24*

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील

शेतकऱ्यांनी विविध बाबींसाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

 

लातूर, दि. 15 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-2024 अंतर्गत फुलपिक लागवड, मशरुम उत्पादन, हरीतगृह, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, टॅक्टर 20 एचपी, शेतकरी अभ्यास दौरा, सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ, पॅक हाऊस व प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादी घटकासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 23 लाख रुपये व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 3 लाख रुपये निधी प्राप्त झालेला आहे.  याबाबींचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस.व्ही. लाडके यांनी केले आहे.  

अर्जासाठी महा-महाडीबीटीचे https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login किंवा http://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. तसेच संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सातबारा, आठ अ, बँक पासबुक व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे.

तरी सर्व इच्छूक शेतकऱ्यांनी महा-डिबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. लाडके यांनी केले आहे.

****  

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा