चापोलीच्या संजीवनी महाविद्यालय येथे 22 डिसेंबर रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

                                                 चापोलीच्या संजीवनी महाविद्यालय येथे

22 डिसेंबर रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 

लातूर, दि. 18 (जिमाका) :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, लातूर आणि चाकूर तालुक्यातील चापोली  येथील संजीवनी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 10 वाजता चापोली येथील संजीवनी महाविद्यालय येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त बा.सु. मरे यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यासाठी नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर येथील 7 आस्थापना, उद्योजक यांनी एकूण 210 रिक्तपदे अधिसुचित केली आहेत. यामध्ये पुणे येथील टॅलेंटसेतु सर्व्हिसेस प्रा.लि.मध्ये ट्रेनीच्या 30 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी पात्रता आयटीआय (सर्व ट्रेड ), डिप्लोमा (मेकॅनिकल/ॲटोमोबाईल) बी.ई. अशी आहे. पुणे येथील इन्स्टीट्युट ऑफ बँकिंग फायनान्स स्कील अकॅडमी येथे रिलेशनशिप ऑफिसर, सेल्स ऑफिसरच्या 40 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. बीएसएस मायक्रो फायनान्समध्ये फिल्ड ऑफिसरच्या  20 जागांसाठी दहावी, बारावी, कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. या आस्थापनेत रिलेशनशिप ऑफिसर, कलेक्शन ऑफिसर 25 च्या पदांसाठी  पात्रता बारावी अथवा कोणतीही पदवी आहे. पनवेल येथील लार्सन ॲन्ड टुब्रो लिमिटेड कन्सट्रकशन स्कील ट्रेनिंग इन्स्टीट्युटमध्ये फॉमवर्क कारपेंट्री, बार बाईंडीग ॲन्ड स्टील फीक्सींग, अडव्हान्स मॅसनरी,  टायलिंग स्टोन वर्क, कन्सट्रकशन इलेक्ट्रीशीअन पाईप वेल्डरच्या 50 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी दहावी, आयटीआय (इलेक्ट्रीशन/वायरमन) उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील मुथुट मायक्रोफिन लि.मध्ये ब्राँच रिलेशनशिप मॅनेजर, ब्राँच क्रेडिट मॅनेजर, रिलेशनशिप ऑफिसर, एरिया मॅनेजरच्या 30 जागांसाठी मुलाखती होणार असून यासाठी कोणतीही पदवीधारक उमेदवार पात्र आहेत. लातूर येथे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसीसाठी प्रतिनिधीच्या 15 जागांसाठी दहावी, बारावी अथवा कोणतीही पदवीधारक उमेदवार पात्र आहेत. 

रिक्तपदे निहाय इच्छूक उमेदवारांनी 22 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 10 वाजता चाकूर तालुक्यातील चापोली येथील संजीवनी महाविद्यालय येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम / बायोडाटा/  पासपोर्ट फोटो इ. (पाच प्रती) सह  उपस्थित रहावे, असे अवाहन सहाय्यक आयुक्त श्री. मरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या 02382- 299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा