29 डिसेंबरपर्यंत लातूर शहर मतदारसंघामध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविली जाणार

                                   29 डिसेंबरपर्यंत लातूर शहर मतदारसंघामध्ये

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविली जाणार

लातूर दि. 12 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिम राबविण्याबाबत येणार आहे.  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर- घुगे यांच्या आदेशानुसार निवडणूक घोषित करण्याच्या तीन महिने अगोदर म्हणजेच 10 डिसेंबर, 2023 ते 29 डिसेंबर, 2023 या कालावधीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील प्रचार प्रसिध्दी ही तीन स्वरुपात किंवा पातळीवर करण्यात येणार आहे. यामध्ये ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र (ईडीसी), मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्यक्षिक (एमडीव्ही) व डिजिटल आऊरीचमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या जनजागृती संबंधातील नाविन्यपूर्ण क्रिएटिव्ह कन्टेंट स्थानिक भाषामध्ये तयार करुन तो प्रसिध्द करण्यात येणार आहे.  

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती संबंधातील ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र ईडीसी लातूर तहसील कार्यालय येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. प्रात्यक्षिक केंद्रामध्ये जनतेला ईव्हीएम, व्हीव्हीपॅट वे कार्य कशा पध्दतीने चालते हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे. प्रात्यक्षिक केंद्र हे 29 फेब्रुवारी, 2024 पर्यंत कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे.

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमे अंतर्गत लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये एक मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती व प्रात्यक्षिक प्रचार कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मोबाईल व्हॅनवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट ठेवण्यात येणार असून नाविन्यपुर्ण क्रिएटिव्ह कन्टेंट स्थानिक भाषामध्ये तयार करुन त्याद्वारे प्रचार व जनजागृती करण्यात येणार आहे. ही मोबाईल 29 फेब्रुवारी, 2024 पर्यंत या संपूर्ण लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार व ठरवुन दिलेल्या रुटनुसार फिरणार आहे. यासाठी तीन पथके गठीत करण्यात आलेली आहेत, असे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे यांनी सांगितले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु