Posts

लातूर येथील सैनिकी मुलां-मुलींचे वसतिगृहात प्रवेशाबाबत आवाहन

  लातूर येथील सैनिकी मुलां-मुलींचे वसतिगृहात प्रवेशाबाबत आवाहन   लातूर ,   दि. 13:     लातूर येथे आधुनिक पध्दतीच्या सर्व सोयी उपलब्ध असलेले स्वच्छ, सुंदर व कमी  दरामध्ये माजी सैनिक मुलां - मुलींचे वसतिगृह कार्यरत आहे. या वसतिगृहात लातूर येथे सन  2025-2026 मध्ये शिक्षण घेणा ऱ्या  सर्व माजी व आजी सैनिकांच्या तसेच युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या मुलां - मुलींना पहिल्या टप्प्यात प्रवेश दिला जाईल. तसेच खाजगी शिकवणीचे वर्ग जे की पूर्ण शैक्षणिक वर्ष चालू असणारे व कमीत कमी  दररोज 6 तासपेक्षा जास्त  शिकवणी घेत असलेल्या बोनाफाईडधारक माजी सैनिक ,  आजी सैनिक तसेच युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना दुसरा टप्प्यात प्रवेश देण्यात येईल. तसेच ही प्रवेश प्रक्रियेत जागा पूर्ण भरल्या नसल्यास उर्वरित जागेसाठी  पुणे  सैनिक कल्याण विभाग ाचे  संचालक यांच्या परवानगीने नागरी मुलां - मुलींना तिसरा टप्प्यात वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल. तरी सन 2025-2026 करिता प्रवेश घेण्यास   इच्छूक  असणा ऱ्या  मुलां - मुलींसा...

लातूर येथील सैनिकी मुलां - मुलींचे वसतिगृह येथे धान्य पुरवठ्यासाठी दरपत्रक पाठवावेत

  लातूर येथील  सैनिकी मुलां  -  मुलींचे वसतिगृह   येथे धान्य पुरव ठ्यासाठी दरपत्रक पाठवावेत     लातूर ,   दि. 13:   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलां - मुलींचे वसतिगृह, सैनिक संकुल, अंबाजोगाई रोड, लातूर येथे अंदाजे प्रतिदिन 100  विद्यार्थ्यांसाठी  दरमहा धान्य खरेदी करण्यात येते. त्याकरिता लातूर  जिल्ह्यातील  सर्व धान्य विक्रेता ,  व्यापारी  यांनी  1 जुलै ,  2025 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीसाठी सर्व धान्याचे कमीत कमी चार महिन्या ं चे स्थिर भाव दरपत्रक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लातूर  यांच्या  नांवे  दि.  23  जून,  2025 पर्यंत बंद पॉकेटमध्ये सैनिक मुलांचे - मुलींचे वसतिगृह, लातूर येथे सादर करावे त,  असे  लातूर येथील  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.)  यांनी कळविले आहे. ****

सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण

  सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण              लातूर ,  दि. 12 :  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आवाहनानुसार 10 जून 2025 रोजी लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात आणि समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.             सामाजिक न्याय भवन परिसरात आयोजित कार्यक्रमात लातूर आयएमए महिला विंगच्या डॉ. ज्योती सुळ आणि इतर महिला डॉक्टर ,  लातूर वृक्ष चळवळ ,  तसेच सह्याद्री देवराई चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी 16 वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आले ,  तसेच उपस्थित 31 महिलांना वडाची रोपे भेट देण्यात आली. याशिवाय ,  समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त 25 शासकीय वसतिगृह आणि 6 निवासी शाळांमध्येही महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.             समाज कल्याण सहायक आयु...

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

  ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू लातूर ,  दि.  12 ( जिमाका):  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने   राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने   अंतर्गत कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना दरमहा  5  हजार  रुपये मानधन देण्याची योजना जाहीर केली आहे.  16  मार्च  2024  रोजीच्या  शासन निर्णयानुसार   या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना  31  जुलै  2025  पर्यंत राज्य शासनाच्या   आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय  50  वर्षांपेक्षा जास्त असावे (दिव्यांगांसाठी  40  वर्षे), कला आणि साहित्य क्षेत्रात किमान  15  वर्षांचे सातत्यपूर्ण ,  दर्जेदार योगदान असावे, ज्येष्ठ ,  विधवा ,  परित्यक्ता ,  आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येईल, कुटुंबाचे वार्षिक उत्...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत महत्त्वपूर्ण बदल; प्रकल्प मर्यादा वाढवून अनुदानातही वाढ

  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत महत्त्वपूर्ण बदल ;  प्रकल्प मर्यादा वाढवून अनुदानातही वाढ लातूर ,  दि.   १२ ( जिमाका):   सुशिक्षित   बेरोजगारांना   स्वयंरोजगारासाठी   आर्थिक   सहाय्य करणाऱ्या   मुख्यमंत्री   रोजगार   निर्मिती   कार्यक्रम योजनेत   राज्य   सरकारने   महत्त्वाचे   बदल   केले   आहेत.   याबाबतचा   सुधारित   शासन   निर्णय   नुकताच   जारी   करण्यात   आला आहे.   या   योजनेअंतर्गत   आता   सेवा   उद्योग ,  कृषिपूरक   व्यवसाय ,  कृषिवर   आधारित   उद्योग ,  ई-वाहतूक ,  ब्रँड   आधारित   साखळी   विक्री   केंद्रे ,  फिरते   विक्री   केंद्रे ,  खाद्यपदार्थ   केंद्रे ,  कुक्कुटपालन ,  अंडी   उबवणी   केंद्रे ,  मधुमक्षिकापालन ,  मत्स्यपालन ,  रेशीम   उद्योग ,  हॉटेल ,  धाबा ,  शाकाहार...

चाकूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

  चाकूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु लातूर, दि. 12 (जिमाका): राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत चाकूर येथे झरी रोडवरील चालविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रोड या संस्थेत 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या व इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील विद्यालयीन, इयत्ता अकरावी, बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत नाष्टा, भोजन, निवासाची व्यवस्था असून, क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश, ड्रेसकोड, अॅप्रन, शैक्षणिक सहल, क्रीडा साहित्य इत्यादी शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. विद्यार्थी चाकूरचा स्थानिक रहिवासी ...

कन्यादान योजनेसाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे प्रस्ताव मागवले

  कन्यादान योजनेसाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे प्रस्ताव मागवले लातूर ,  दि. १० (जिमाका):  छत्रपती संभाजीनगर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या योजनेचा उद्देश विवाहातील अनुचित प्रथा रोखणे आणि सहभागी दाम्पत्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. प्रस्ताव विहित नमुन्यातील अर्जासह (कार्यालयात उपलब्ध) सादर करावेत. संस्थांनी विवाहाचे ठिकाण ,  तारीख आणि वर-वधूंच्या सत्यप्रत अर्जासह प्रस्ताव पाठवावेत. अर्जाचा नमुना शासकीय सुट्टी वगळता कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले प्रस्ताव ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. योजनेची अंमलबजावणी ,  कालावधी आणि लक्षांक बदल करण्याबाबतचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी ,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,  छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे राखीव आहेत ,  असे प्रकल्प अधिक...