लातूर येथे 'महा-उपलब्धी' ॲपबाबत ६ ऑक्टोबर रोजी निवृत्तीवेतनधारकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

लातूर येथे 'महा-उपलब्धी' ॲपबाबत ६ ऑक्टोबर रोजी निवृत्तीवेतनधारकांसाठी कार्यशाळेचे आयोजन लातूर, दि. २५ : वित्त विभागाच्या १९ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार १ जुलै २०२६ पासून निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "Maha-UPLABDHI" (महा-उपलब्धी) हे मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपमुळे निवृत्तीवेतनविषयक सर्व सेवा जलद आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणे शक्य झाले आहे. या मोबाईल ॲपबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी लातूर कोषागार कार्यालय यांच्या वतीने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कोरे गार्डन सभागृह, मोतीनगर, लातूर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस वित्त विभागाचे प्रधान सचिव ऑनलाईन उपस्थित राहून उपस्थितांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. तरी लातूर कोषागार कार्यालयांतर्गत निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेला न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन लातूरचे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उ. भा. पाटील यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत