क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा लातूर, दि. ३१ : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे रविवार, १ सप्टेंबर, २०२४ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे १ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता लातूर रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल व मोटारीने शकुंतला निवासस्थानकडे प्रयाण करतील. सकाळी १० वाजता लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील ललित मंगल भवन येथील स्वा. सै. मन्मथअप्पपा चिल्ले शताब्दी आयोजन समिती व आर्य समाज करडखेलच्यावतीने स्वा. सै. मन्मथअप्पा भद्रअप्पा चिल्ले (पू. आनंदमुनिजी) यांच्या गौरव शताब्दी समारंभास उपस्थिती. सकाळी ११.४० वाजता उदगीर शहरातील कौळखेड रोडवरील वसंतराव नाईक चौक येथे आनंद व्यसनमुक्ती केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यास ते उपस्थिती. दुपारी १२ वाजता उदगीर शहरातील कौळखेड रोडवरील शिवम फंक्शन हॉल येथे महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या ४ सप्टेंबर, २०२४ च्या उदगीर दौरा अनुषंगाने सर्व पत्रकार बांधवांशी स...