प्रादेशिक परिवहन विभागाच्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रादेशिक परिवहन विभागाच्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर, दि. 13 (जिमाका) : हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत आज (दि. 13) प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच ड्रायव्हिंग स्कूल प्रतिनिधी व स्कूल बस प्रतिनिधी यांचा सहभागी झाले होते.
सकाळी लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथून रॅलीला सुरुवात झाली. राजीव गांधी चौक, रिंग रोड, महात्मा बसवेश्वर चौक, बाभुळगाव नाका मार्गे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आल्यानंतर रॅलीची सांगता झाली.
यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यरम मोटार वाहन निरीक्षक सुरेश माळी, अशोक जाधव, धनंजय थोरे, विशाल यादव, संजय आडे, श्रीमती गोसावी, शांताराम साठे, मंगेश गवारे, संदीप मोरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अक्षय मुसळे, राजकुमार नसरगोंडे, स्वप्नील राजूरकर, अमोल सोमदे, अश्विन सोनकांबळे, श्रीमती आवळे यांच्यासह लातूर जिल्हा विधार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पाडे यांची उपस्थिती होती.
*****
Comments
Post a Comment