चित्ररथाद्वारे ‘महाज्योती’च्या योजनांची होणार जनजागृती

 चित्ररथाद्वारे ‘महाज्योती’च्या योजनांची होणार जनजागृती

लातूरदि. १९ (जिमाका) : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. याबाबत जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार असून प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले यांनी आज या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविली.

उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक शिवकांत चिकुर्ते यावेळी उपस्थित होते.

राज्यातील इतर मगासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी, युवकांसाठी ‘महाज्योती’मार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची जनजागृती करण्यासाठी ‘महाज्योती’मार्फत चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात जावून योजनांची माहिती देणार आहे.

***** 



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा