लातूर जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी झालेल्या मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक जाहीर ▪️ उमेदवारांना 30 ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदविण्याची संधी

लातूर जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी झालेल्या मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक जाहीर ▪️ उमेदवारांना 30 ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदविण्याची संधी लातूर, दि. 29 : लातूर जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी बाभळगाव येथील पोलीस मुख्यालय येथे 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024 या कालावधीत पथकनिहाय होमगार्ड नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी, शारिरीक व मैदानी चाचणी घेण्यात आली. या प्रक्रिये दरम्यान मैदानी चाचणीत दिनांकनिहाय सहभागी झालेल्या उमेदवारांचे तात्पुरते गुणपत्रक https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर करण्यात आले आहे. सहभागी उमेदवारांनी तात्पुरत्या गुणपत्रकाचे अवलोकन करून त्याबाबत काही आक्षेप असल्यास लातूर जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाच्या homeguardlatur123@gmail.com ई-मेल आयडीवर किंवा 7558600220 या व्हॉटस्अप किंवा प्रत्यक्ष जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, बार्शी रोड, लातूर येथे लेखी स्वरूपात 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावेत. सायंकाळी 6 वाजेनंतर येणारे आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, असे लातूर जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा