उदगीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आकर्षक वाहन क्रमांकासाठी 28 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

उदगीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आकर्षक वाहन क्रमांकासाठी 28 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन लातूर, दि.26 (जिमाका) : उदगीर (MH55) येथेनवीन उप प्रादेशिक परिवहनकार्यालय सुरु झालेले आहे. या अंतर्गत उदगीर, अहमदपूर,जळकोट, देवणी, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील नागरिकांना सेवा दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने या कार्यालयात दुचाकी, चारचाकी, परिवहन संवर्गातील तीन चाकी व परिवहन संवर्गातील चारचाकी व जड वाहनांसाठी नवीन वाहन मालिका संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवर दि. 28 ऑगस्ट, 2024 रोजी दुचाकी मालिका MH55वाहन क्रमांक 0001 ते 9999, चारचाकी मालिका MH55-A वाहन क्रमांक 0001 ते 9999, परिवहन संवर्गातीलहलके चारचाकी वाहने व जड वाहने मालिका MH55-Bवाहन क्रमांक 0001 ते 9999, परिवहन संवर्गातील तीन चाकी वाहने मालिका MH55-C वाहन क्रमांक 0001 ते 9999 या मालिकेतील शासकीय नियमानुसार शुल्क भरुन घेणे चालू केले जाईल. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनास आकर्षक क्रमांक घ्यावयाचा आहे, त्यांनी 28 ऑगस्ट रोजी उदगीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून आपले आकर्षक क्रमांक शुल्क भरुन आरक्षीत करुन ठेवावेत. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार नोंदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येतील. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 5 (अ) मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र उदा. आधार कार्ड / निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट / पॅन कार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल. आकर्षक नोंदणी क्रमांक संगणकीय ‘वाहन 4.0’ या प्रणालीवर देण्यात येत असल्याने अर्जासोबत वाहनधारकाचा वैध ई-मेल आयडी, आधार कार्ड क्रमांक व आधार कार्डला संलग्‍न असलेला वैध भ्रमणध्वनी क्रमांक, पीन कोड क्रमांक देणे बंधनकारक आहे. 28 ऑगस्ट, 2024 रोजी आकर्षक क्रमांकासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत दुचाकी, चारचाकी, परिवहन संवर्गातील तीन चाकी व परिवहन संवर्गातील चारचाकी व जड वाहनांसाठी अर्जासह राष्ट्रियकृत बँकेचा धनाकर्ष (Demand Draft)स्वीकारला जाईल. धनाकर्ष(Demand Draft) हा Dy. Regional Transport Officer, Udgirया नावे काढण्यात यावा. ज्या आकर्षक क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्या अर्जदारास त्याच दिवशी आकर्षक नोंदणी क्रमांक दिला जाईल. मात्र एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणी अर्जदारांनी कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित शुल्काचा धनाकर्ष (Demand Draft) व दुसरा जास्त रक्कमेचा धनाकर्ष (Demand Draft) बंद लिफाफ्यातसादर करावा. जो अर्जदार दुसरा धनाकर्ष (Demand Draft) सर्वात जास्त रक्कमेचा सादर करेल त्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरित अर्जदारांना त्यांचे धनाकर्ष (Demand Draft) त्वरीत परत देण्यात येतील. आकर्षक क्रमांक आरक्षित केल्यानंतर 30 दिवसाचे आत वाहनधारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. आकर्षक नोंदणी क्रमांक दरवाढी संदर्भात शासनाने 3 डिसेंबर, 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचना प्रक्रियेच्या आधिन राहून दुचाकी, चारचाकी, परिवहन संवर्गातील तीन चाकी व परिवहन संवर्गातील चारचाकी व जड वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरु करण्यात येत आहे. ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा