क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पोलीस दलातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव


लातूर, दि. १५ :  भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. खडतर सेवा पूर्ण केल्याने विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यावेळी उपस्थित होते.

विशेष सेवा पदक जाहीर झालेले पोलीस उप निरीक्षक गजानन व्यंकटराव तोटेवाड, पोलीस उपनिरीक्षक अक्षय माधवराव पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता हवाप्पा मडोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू अशोक गाडवे, विशेष दल सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक सुरेश काशीराम पोगुलवार, पोलीस प्रशिक्षण उत्कृष्टता गृहमंत्री पदक जाहीर झालेले कनिष्ठ श्रेणी लिपिक युवराज अशोक गायकवाड, पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेले पोलीस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक माधव दत्तात्रय केंद्रे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी रामचंद्र जाधव, सहायक पोलीस उपनरीक्षक अरुण रुक्माजी डोंगरे, हेड कॉन्स्टेबल परमेश्वर बाबुराव अभंगे, हेड कॉन्स्टेबल शिवाजी निवृत्ती गुरव, बाळासाहेब मस्के यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु