उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लातूर जिल्हा दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लातूर जिल्हा दौरा लातूर, दि.27 (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवार, दिनांक 28 ऑगस्ट, 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील. उपमुख्यमंत्री ना. पवार यांचे 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9-15 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी 11 वाजता चाकूर तालुक्यातील महाळंग्रा बस स्टँडजवळ आगमन. येथून सकाळी 11.05 वाजता स्वागत रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर अहमदपूर शहरातील चाकूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करतील. दुपारी 12.10 वाजता थोडगा रोडवरील चामे गार्डन व फंक्शन हॉल येथे जनसन्मान यात्रा - लाडक्या बहिणींसोबत संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर उजना येथील सिध्दी शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्री येथे राखीव. दुपारी प्रयाण. 4 वाजता रुध्दा पाटी येथील श्री साई गणेश मिलिटरी ट्रेनिंग सेंटर येथील येथे आगमन. 4.05 वाजता हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील. ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु