महसूल पंधरवाडा अंतर्गत आज सर्व तहसील कार्यालयांमध्ये 'सैनिकहो तुमच्यासाठी...' उपक्रम

 महसूल पंधरवाडा अंतर्गत आज सर्व तहसील कार्यालयांमध्ये 'सैनिकहो तुमच्यासाठी...' उपक्रम


लातूर, दि. 9 (जिमाका) : महसूल पंधरवाडा अंतर्गत शनिवार १० ऑगस्ट, २०२४  रोजी सकाळी ११.०० वाजता सर्व तहसील कार्यालयांमध्ये 'सैनिकहो तुमच्यासाठी...' उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये तहसीलदार व महसूल अधिकारी, कर्मचारी हे आजी माजी सैनिकाच्या महसूल संबंधी तक्रारीचा आढावा घेवून त्यावर आवश्यक कार्यवाही करणार आहेत. 


आजी माजी सैनिक, त्यांचे अवलंबित यांनी आपापल्या तालुक्यामध्ये तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या 'सैनिकहो तुमच्यासाठी...' या उपक्रमाला कागदपत्रांसह उपस्थित राहावे. आपल्या समस्या, तक्रारी संबधित तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि.) यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु