परळी वैद्यनाथ येथे 21 ते 25 ऑगस्ट, 2024 या कालावधीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 चे आयोजन

 परळी वैद्यनाथ येथे 21 ते 25 ऑगस्ट, 2024 या कालावधीत

राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 चे आयोजन

 

 

लातूर, दि. 19 :  21 ते 25 ऑगस्ट, 2024 या कालावधीत बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कॉटन मार्केट यार्ड नाथ रोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024   आयोजित करण्यात आला आहे.

कृषी महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, कृषी विद्यापीठे दालन, परिसंवाद , चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, विक्रेता , खरेदीदार संमेलन शेतकरी सन्मान समारंभ, सेंद्रिय शेतीमाल विक्री, रानभाजी महोत्सव, आधुनिक कृषी अवजारे प्रदर्शन, स्वंयसहाय्यता महिला बचत गट निर्मित वस्तू पदार्थांचे विक्री व प्रदर्शन असे विविध प्रकारचे स्वतंत्र दालन व चर्चासत्र आयोजित करण्यात आलेली आहेत. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर.टी. जाधव यांनी केले आहे.

****  

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु