‘एक पेड, माँ के नाम’ मोहिमेंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रात वृक्षारोपण

 ‘एक पेड, माँ के नाम’ मोहिमेंतर्गत

केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रात वृक्षारोपण


लातूर, दि. १९ : 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'एक पेड माँ के नाम' ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रात उपमहानिरीक्षक अमीरुल हसन अन्सारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या आईच्या नावाने वृक्ष लागवड करीत सहभाग नोंदविला.

पोलीस उपमहानिरीक्षक अमिरुल हसन अन्सारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात झाली. निसर्गाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवड अतिशय आवश्यक आहे. झाडांमुळे प्राणवायू मिळण्यास मदत होते, ज्याठिकाणी अधिक वृक्ष आहेत, तिथे पाऊस अधिक पडतो. त्यामुळे वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावेत. यापुढे प्रत्येक वर्षी प्रशिक्षण केंद्रामध्ये वृक्षारोपण केले जाईल, असे पोलीस उपमहानिरीक्षक अमीरुल हसन अन्सारी यांनी सांगितले.

या मोहिमेअंतर्गत फळझाडे, फुलझाडे आणि षधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारीजवानप्रशिक्षणार्थी तसेच लातूर जिल्ह्यातील विविध कार्यालये व शाळांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी अधिकारी, जवानांनी आजूबाजूच्या गावांमध्येही वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु