महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा वर्धापन दिन लातूर विभागीय कार्यालयात उत्साहात साजरा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा वर्धापन दिन
लातूर विभागीय कार्यालयात उत्साहात साजरा
लातूर, दि. 10 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा 67 वा वर्धापन दिन 8 ऑगस्ट 2024 रोजी लातूर विभागीय कार्यालय येथे उत्साहात साजरा झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक महादेव बरडे उपस्थित होते.
लातूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक निलेश चंद्रसेन लांडे, उपव्यवस्थापक (अभि.) मखमुल अहमद शेख, शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष तथा सदस्य लालासाहेब देशमुख व विलास उफाडे, महामंडळाचे प्रमुख ठेवीदार, आर. सी. एफ., भारतीय खाद्य निगम यांचे प्रतिनीधी यावेळी उपस्थित होते.
विभागीय व्यवस्थापक श्री. लांडे यांनी महामंडळाने 67 वर्षामध्ये केलेल्या प्रगतीची माहिती दिली. तसेच महामंडळाकडून शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक संस्थांना पुरविण्यात येत असलेल्या सेवा-सुविधांची माहिती देऊन महामंडळाच्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
लातूर विभागातील उत्कृष्ट वखार केंद्र, उत्कृष्ट ठेवीदार व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
*****
Comments
Post a Comment