आपत्ती व्यवस्थापन जनजागृती मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
· जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दाखविली हिरवी झेंडी
· मुलींमध्ये पुष्पा राठोड, मुलांमध्ये आदित्य पवार प्रथम
लातूर, दि. 13 (जिमाका) : आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन विभागातर्फे राज्यात उद्भवऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी आज लातूर येथे मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु झालेल्या या मिनी मॅरेथॉनला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी हिरवी झेंडी दाखविली.
सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर वाय. पी. सिंग, एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा. अनघुले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, गृहरक्षक दल, अग्निशमन दल तसेच जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्य यांनी या मिनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा 2 किमी लांबीची होती. जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात झाल्यानंतर पीव्हीआर चौक ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर या मिनी मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला.
मुलींमध्ये पुष्पा सुभाष राठोड हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर राणी सुनील साळुंके आणि वैष्णवी लिंबराज उत्तेकर यांनी अनुक्रम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच मुलांमध्ये आदित्य पवार याने प्रथम, संकेत पांढरे याने द्वितीय आणि वेदांत मामडे याने तृतीय क्रमांक पटकाविला. या सर्वांना राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणच्यावतीने जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी पंच म्हणून जयक्रांती महाविद्यालयाचे शिवराज बाजूळगे, राहुल होनसांगळे, अमर सूर्यवंशी, ओमकार माळी यांनी काम पहिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विलास मल्लीशे, श्रीराम वाघमारे, श्रीमती अफरोज शेख, प्रतिक देशमुख, भारत पुंड, लक्ष्मण सादळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
*****
Comments
Post a Comment