अपघातामध्ये मृत अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत आवाहन
अपघातामध्ये मृत अनोळखी व्यक्तीची
ओळख पटविण्याबाबत आवाहन
लातूर दि. 26 : रोड अपघातामध्ये मृत झालेल्या 40 वर्षीय इसमाचे प्रेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 25 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 5.15 वाजता दाखल करण्यात आले आहे. या अनोळखी इसमाचे शवविच्छेदन करण्याबाबत एम. एल.सी. पत्रक व पोलीस रिपोर्ट सह विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला 25 ऑगस्ट, 2024 रोजी 7.22 वा. प्राप्त झाले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हवलदार पी. ए. कोकणे हे करीत आहेत.
मृत अनोळखी इसमाचे वय अंदाजे 40 वर्ष, उंची अंदाजे -165 से.मी. , केस काळे, , पांढरे, रंग सावळा, शरीर बांधा-सडपातळ, अंगा काळी पॅन्ट , मेहंदी रंगाची अन्डरवेअर, उघड्या स्थितीत, दाडी व मिशी पांढऱ्या काळ्या रंगाची, कमरेला लाल व काळ्या रंगाचा करदोड, उजव्या हातात केशरी व लाल रंगाचा दोरा बांधलेला, उजव्या हाताच्या पोटरीवर (मेरा -2) असे गोंदलेले आहे. तसेच रोड अपघातामुळे शरीरावर ठिकठिकाणी व डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या दिसत आहेत.
या वर्णनाच्या अनोळखी मयताची माहिती मिळाल्यास विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला माहिती कळवावी, असे आवाहन लातूर येथील पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व तपासिक अमंलदार यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment