युवा वर्गाने समाज हितासाठी केलेल्या कार्याचा होणार गौरव !
युवा वर्गाने समाज हितासाठी केलेल्या कार्याचा होणार गौरव !
· युवा पुरस्कारासाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि.10 (जिमाका) : राज्याचे युवा धोरण 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने 12 नोव्हेंबर, 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक-युवतींना व नोंदणीकृत संस्थांना, त्यांनी समाजहितासाठी कार्याबद्दल जिल्हा युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास 20 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थानी 2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23, 2023-24 या पाच वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी 20 जुलै, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार केवळ 12 पुरस्कार अर्ज प्राप्त झाल्यामुळे जिल्हास्तरावर युवा पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
या पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावेत. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (भ्रमणध्वनी क्र. 9975576600) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment