पोस्ट ऑफिसच्या नावे येणाऱ्या फेक कॉल, ‘एसएमएस’पासून सावध राहण्याचे आवाहन
पोस्ट ऑफिसच्या नावे येणाऱ्या फेक कॉल,
‘एसएमएस’पासून सावध राहण्याचे आवाहन
लातूर, दि. 31 (जिमाका) : सध्या इंडिया पोस्ट ऑफिसच्या नावे मोबाईलवर फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. खोटे एसएमएस आणि कॉल करून पत्ता अपडेट करणे किंवा बँक खाते अपडेट करण्यासाठी चौकशी केली जात आहे. यासाठी एखादी वेबलिंक पाठवली जात आहे किंवा ओटीपी विचारला जात आहे. अशा प्रकारापासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन धाराशिव विभागाचे डाक अधीक्षक संजय एन. अंबेकर यांनी केले आहे.
अशा कुठल्याही प्रकारचे एसएमएस किंवा कॉल किंवा वेबलिंक भारतीय डाक विभागामार्फत पाठविले जात नाहीत. तसेच कुठलाही ओटीपी भारतीय डाक विभागामार्फत मागितला जात नाही, याची सर्व जनतेने नोंद घ्यावी आणि सतर्क रहावे, असे आवाहन श्री. अंबेकर यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment