‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज तिरंगा यात्रेचे आयोजन

 हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज तिरंगा यात्रेचे आयोजन

·         9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

·         सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन

लातूरदि. 8 : जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाला शुक्रवारी (दि. 9) लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथून तिरंगा यात्रेने सुरुवात होणार असून या यात्रेमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्ज्वल भावना कायमस्वरुपी मनात राहावीयासाठी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गाव ते जिल्हास्तरावर दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या अभियानाची सुरुवात 9 ऑगस्टपासून होत असून यानिमित्ताने प्रत्येक गावात व तालुक्याच्या ठिकाणीही तिरंगा यात्रा आयोजित केली जाणार आहे. या यात्रेमध्ये तिरंगा ध्वज हातात घेवून सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

******

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु