मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आतापर्यंत 401 जणांची निवड
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आतापर्यंत 401 जणांची निवड
लातूर, दि. 20 : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळण्याची त्यांची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 133 पदे अधिसूचित झाली आहेत. यापैकी 401 जणांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच पदे अधिसूचित करण्याची व निवडीची प्रक्रिया सुरू आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय तथा निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी इयत्ता बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारक प्रशिक्षणार्थींना 8 हजार रुपये आणि पदवीधर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे.
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5 टक्के किंवा किमान एक उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.
लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, आणि विविध आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.
Comments
Post a Comment