गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी सुरु होतेय भ्रमंती ऐतिहासिक स्थळांची...! ‘लातूर हेरिटेज वॉक’ उपक्रमाला 16 ऑगस्टपासून होणार प्रारंभ

 गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी सुरु होतेय भ्रमंती ऐतिहासिक स्थळांची...!

‘लातूर हेरिटेज वॉक’ उपक्रमाला 16 ऑगस्टपासून होणार प्रारंभ

·         लातूर जिल्हा स्थापना दिनानिमित्त आयोजन

·         दर महिन्याला एका वारसा स्थळी भेट

लातूरदि. 14 (जिमाका) : 16 ऑगस्ट हा लातूर जिल्ह्याचा स्थापना दिवस. या दिवसाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील इतिहास प्रेमी नागरिक, इतिहास अभ्यासक आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘लातूर हेरिटेज वॉक’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे. ऐतिहासिक गंजगोलाई येथून या उपक्रमाला 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6.30 वाजता सुरुवात होणार आहे.

लातूर जिल्ह्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या वारसा स्थळांची माहिती नव्या पिढीला व्हावी, यामाध्यमातून त्यांच्यामध्ये या वारसा स्थळांबाबत जागृती होवून संवर्धनाची भावना वाढावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘लातूर हेरिटेज वॉक’च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एका वारसास्थळी भ्रमंतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी, नागरिक यांना संबंधित वारसा स्थळाचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील नामवंत इतिहास अभ्यासक या ऐतिहासिक स्थळांचा इतिहास उलघडणार आहेत.

आपल्या जिल्ह्यातील वारसास्थळे आणि त्यांच्याशी निगडीत वैभवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी ‘लातूर हेरिटेज वॉक’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन इतिहास अभ्यासकइतिहास प्रेमी नागरीक आणि लातूर जिल्हा प्रशासाच्यावतीने करण्यात आले आहे.

*****



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा